Heroin seized : केरळमध्ये १ हजार २०० कोटी रुपयांचे हेराॅइन जप्त, तस्करी मागे पाकिस्तानच्या हादी नेटवर्कचा संबंध

केरळमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एनसीबी व नौदलाच्या वतिने संयुक्त कारवाई करीत २०० किलो पेक्षा जास्त हेराॅइन जप्त केले असून या हे रॉइनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत १ हजार २०० कोटी रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे . असे एनसीबी च्या सूत्रांद्वारे सांगितले आहे.
एका इराणी जहाजांवरून ही अमली पदार्थ जप्त केले आहे. सदरचे हे राॅइन हे अफगाणिस्तान मधून भारतात पाठविण्यात येत होते. व यामधील काही.हेराॅइन हे श्रीलंका मध्ये पाठविण्यात येणार होते. या संपूर्ण हेराॅइन तस्करी मध्ये पाकिस्तान मधील हादी सलीम नेटवर्कचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनसीबी चे उपमहासंचालक व डी डी जी चे संजय कुमार सिंह यांनी माहिती दिली की याप्रकरणी एकूण सहा इराणी तस्करांना अटक केल्याचे सांगितले आहे. अटक असलेली तस्कर हे सर्वजण इराणचे रहिवासी आहेत.
त्यांच्यावर आता एडीपीएस कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले ही आपली पदार्थ हे अफगाणिस्तान मधून इराणच्या जहाजाद्वारे भारतात आणले असून ते हेराॅइन हे वॉटरप्रूफ पॅकिंग मध्ये पॅक करण्यात आले आहे. या पाकिस्तानला एकूण सात लेयर्स मध्ये पॅक करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या हादी सलीम नेटवर्कने या अंमली पदार्थांची तस्करी केली होती. या नेटवर्कद्वारे भारत व इतर देशांमध्ये हेराॅइन.चरस.मेथामफेटामाइनची तस्करी केली जाते. अशी माहिती डीडी जी चे संजय कुमार सिंह यांनी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.