Heroin worth crores seized at the border : सीमेवर कोट्यवधी रुपयांचे हेरॉईन जप्त, 2 ड्रग्ज तस्करांना अटक

पंजाबच्या फाजिल्का या सीमावर्ती प्रांतात अंमली पदार्थांवर कारवाई करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी तस्करांकडून 31 किलो हेरॉईन जप्त केले आहे. फाजिल्का पोलिसांनी तत्परता दाखवत सीमेपलिकडचा भारतात ड्रग्स पाठवण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
फाजिल्का पोलिसांनी २९ बॉक्समधून ३१ किलो २०० ग्रॅम हिरोईन जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात हेरॉईन ची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी हेरॉईनसह दोन तस्करांना देखील अटक केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Punjab News, Heroin worth crores seized at the border News, Punjab Crime News, latest Punjab marathi news and Headlines based from Punjab City. Latest news belongs to Punjab crime news, Punjab politics news, Punjab business news, Punjab live news and more at Polkholnama.