Koregaon park prostitution : हाय प्रोफाईल कोरेगाव पार्क भागातील मसाज सेंटरच्या नावाआड होणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा दोघेजण गजाआड

कोरेगाव पार्क हाय-फाय व हाय प्रोफाईल भागात सुरू असलेल्या मसाज सेंटरच्या नावाआड वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी करून सदरच्या कारवाईत दोघांना गजाआड करून वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींना देखील ताब्यात घेतले आहे.
गजाआड करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे.१) अमीर अबुसुबन हुसेन ( वय.२०.) २) नवाज लालूमियाॅ उदिल ( वय.२१) अशी आहेत. या छाप्या संदर्भात गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. हाय प्रोफाईल भाग असलेल्या कोरेगाव पार्क भागात अवयान स्पा ज्वेल या मसाज सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर. त्यांनी एक डमी ग्राहक पाठवून खात्री करून घेतली.
दरम्यान त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार व त्यांच्या पथकाने सदरच्या स्पा सेंटरवर छापेमारी करून प्रथम तिथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार मुलींना ताब्यात घेतले. व या तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून स्पा सेंटरचा मॅनेजर व त्याचा साथीदार या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार अजय राणे यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ या करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.