Crime : घरात चालणां-या बनावट नोटाचा छापखाना . बार्शी पोलीसांनी रॅकेट उघड करत ७ जणांच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २४ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा बार्शी शहर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सदरच्या कारवाईत ५ लाख रूपायांच्या बनावट नोटा जप्त करून टोळीतील एकूण ७ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत .
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. मिरगणे काॅम्पलेक्स गाळ्यातील व्यापा-यांकडे दोन व्यक्ती बनावट नोटा खपवण्याच्या प्रयत्नात असलेल्याची गोपनीय माहिती १९ जुलै रोजी मिळाली या आधारे पोलिसांनी सापळा रचून १) सुनिल चंद्रसेन कोथिंबिरे ( वय २३ रा.माळीनगर अंबाजोगाई जि.बीड ) २) आदित्य धनंजय सातभाई ( वय २२ रा. स्टेशनरोड गांधी मार्केट परळी वैजिनाथ जि.बीड) यांना ताब्यात घेतले व त्यांचाकडे चौकशी सुरू केली. असता या दोघांनी खदीर जमाल शेख ( वय ३१ रा.परळी जि.बीड ) व विजय सुधाकर वाघमारे ( वय ३२ रा.परळी जि बीड ) यांच्या कडून नोटा घेतल्याची माहिती दिली. या दोघांना अटक करून त्यांच्याकडे ६ हजार रूपायांच्या बनावट नोटा जप्त करून केल्या व चौकशी केली असता त्यांना हे नोटा नितिन उर्फ आप्पा जगन्नाथ बगाडे ( वय ५९ रा.कराड जि.सातारा.)जमीर मोहमद सय्यद ( वय ४० रा.नाशिक रोड सिन्नर फाटा नाशिक) यांच्या कडून नोटा घेतल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांच्याकडे या बनावट नोटा बाबत चौकशी केली असता या बनावट नोटा ह्या मोहळ तालुक्यातील चिंचोळी काटी गावातील तरूणांच्या घरात या प्रिंटीग केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहिती नंतर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारून ललित चंद्रशेखर व्होरा ( वय २६ रा.चिंचोळी काटी ता.मोहळ जि.सोलापूर) पोलीसांनी ८० हजार रूपायांच्या बनावट नोटा व एच पी कलर प्रिंटर कटर पट्टी कागदावर अर्धावट बनावट नोटा व इतर साहित्य जप्त करून ललित व्होरा यांना अटक केली. या संपूर्ण प्रकरणांत पोलिसांनी एकूण ४लाख रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बनावट नोटा प्रकरणी पोलीसांनी एकूण ७ जणांना आता पर्यंत अटक केली असून या मध्ये अन्य कोण व्यक्ती आहेत का याचा संपूर्ण तपास बार्शी पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.