शनिवारी पहाटे तीन वाजता झाला मोठा अपघात : पुण्यातील दरी पुलावर भीषण अपघात.कंटेनरने ४ते ५ वाहनांना उडवलं दोघांचा घटनास्थळीच मृत्यू

पुणे दिनांक ११नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील बंगळुरू ते मुंबई महामार्ग क्रमांक चारवर दरीच्या पुलावर जांभूळवाडी जवळ भरघाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ४ ते ५ वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य ४ जण यात गंभीर रित्या जखमी झाले आहेत.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहनांतून जखमी लोकांना बाहेर काढून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरू ते मुंबई महामार्ग क्रमांक चारवर बोगद्यातूंन बाहेर पडल्यानंतर तीव्र असा उतार आहे.येथून खाली येत असताना दरी पूलावरुन सातारा कडून येणाऱ्या कंटेनरने पुढील वाहनांना उडवलं यात ४ ते ५ वाहनांना पाठीमागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. कंटेनर हा भरघाव वेगाने आला की धडक दिल्याने यातील चार वाहनांचा चक्काचूर झाला आहे.यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे तर अन्य चारजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांना उपचारा करीता तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.अपघाता नंतर कंटेनर पलटी झाला आहे.या अपघाता बाबत पोलिस स्टेशनमध्ये कंटेनर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.