Crime : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात गर्डर बसवितांना १६ कामगार ठार तीन कामगार जखमी मृतांचा आकडा वाढु शकतो

पुणे दिनांक १ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गावर शहापूर तालुक्यात अंतिम टप्प्यात का सुरू असतांना सोमवारी रात्रीच्या वेळेस गर्डर लाॅन्चरसह गर्डर काम करण्या-या कामगारांवर कोसळले या झालेल्या भीषण अपघातात एकूण १५ कामगार ठार झाले तर अन्य तीन कामगार हे जखमीझाले आहेत. त्यांना रूग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे.
ठाणे शहापूर तालुक्यातील मुंबई ते नाशिक महामार्गापसून सहा किलो मीटर अंतरावर सरलांबे गावाच्या हद्दीत समृध्दी महामार्गावर रात्रीच्या वेळेस हे काम चालू होते.या वेळी एकूण १७ कामगार व ९ इंजिनिअर हे ११ वाजता का करीत असतांनाच अचानक पणे लाॅन्चरसह हे गर्डर काम करण्या-यां कमगारांवर कोसळले या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य चालू केले. यात गर्डर खाली कामगार दबले गेले होते. स्थानिक नागरिक व पोलिस. महामार्ग प्रशासनाच्या कामगारांनी मिळून क्रेनच्या सहाय्याने गर्डरखाली दबलेले कामगारांना बाहेर काढण्यात आले.
आद्याप या ठिकाणी अग्नी शामक दल .एन डी आर एफची टीम या ठिकाणी बचाव काम चालू आहे. यात एकूण १६ कामगार ठा झाले आहेत. तीन कामगार यांना रूग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे. या मध्ये अजून चार ते पाच कामगार हे गर्डर खाली दबले आहेत. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढु शकतो. असे सूत्रांच्या आधारे माहिती मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.