आगीत सोळाजण गंभीर रित्या जखमी : हैदराबादमध्ये केमिकल गोदामात भीषण आग 🔥, दोन महिलांसह एकूण सहा जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू

पुणे दिनांक १३ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) दिवाळी सणाच्या कालावधीतच हैदराबाद येथे एक दुर्दैवी अशी मोठी दुर्घटना घडली आहे.हैद्रबाद येथील केमिकल गोदामाला अचानकपणे भीषण आग लागली असून या 🔥 आगीत होरपळून दोन महिलांसह एकूण सहा जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.तर यात एकूण सोळा जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.ही लागलेली आग इतकी भयानक होती की क्षणातच चौथ्या मजल्यावर पोहचली आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना हैदराबाद येथील टी एस नामपल्ली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.येथे केमिकल गोदामाला अचानकपणे आग लागली आहे.घटनास्थळी आगीचे अग्निशमन दलाच्या जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.या इमारती मध्ये बेकायदेशीर रित्या केमिकल साठवून ठेवलेले होते. आग लागल्यानंतर यातील एकूण २१ जणांना बाहेर तातडीने काढण्यात आले आहे.या इमारती मधील सर्व कर्मचारी यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे. पोलिसांकडून या आगी बाबतची चौकशी सुरू आहे. दरम्यान आगीची घटना ही कार रिपेअर करत असतांनाच स्पार्किंग होउन झाली आहे.अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.दरम्यान तेलागंणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी आगीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांन प्रती शोक व्यक्त केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.