पुण्यावरून - नागपूरला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात : छत्रपती संभाजीनगर - जालना महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात बस मध्ये २९ प्रवासी बस पूलावरुन खाली कोसळली

पुणे दिनांक २६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यावरून नागपूरला जाणाऱ्या खासगी बसला छत्रपती संभाजीनगर - जालना महामार्गावर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बस चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने भरघाव वेगाने जाणारी बस पूलावरुन खाली कोसळली या बस मध्ये एकूण २९ प्रवासी होते.हे सर्व प्रवासी जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी जालना येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील चौघाजणांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पूजा ट्रॅव्हल्सची ही खासगी बस पुण्यावरून नागपूरला जात असताना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भरघाव वेगाने जाणाऱ्या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जालना जिल्ह्यातील मात्रेवाडी फाट्यावरील पूलावरुन खाली कोसळली आहे.यात एकूण २९ प्रवासी होते ते सर्व या अपघात जखमी झाले असून.पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जालना जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यातील चार प्रवासी यांची प्रकृती चिंताजनक आहे.या सर्व जखमी प्रवासी यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.