Crime : चिमूरमध्ये तीन तासापासून शेकडो नागरिकांनचा प्रशासनाच्या विरोधात रास्तारोको आंदोलन

पुणे दिनांक २ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) चिमूल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात नागपूर महामार्गावर मूल - नागाभीड मार्गावर मागील ३ तासापासून रास्तारोको आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात नागभीड, ब्रम्हापुरी. चिमूर.सिंदेवाही. या ४ गावातल्या नागरिकांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय क्षेत्रात जनतेच्या कुठल्याही हरकती न घेता समावेश केल्या बद्दल सरकारचा जाहीर निषेध केला जात आहे.
दरम्यान या ४ गावातील शेकडो नागरिक हे आज घोडाझरी तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र याला प्रशासनाच्या वतीने अटकाव केल्यांने त्यांनी मार्गावर आंदोलन करून हा मार्ग आडवून धरला आहे. सन २०१९ या साली चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची घोषणा केली गेली होती .तेव्हा जिल्हाधिकारी यांनी हरकती मागविल्या गेल्या होत्या. व त्याचा अहवाल शासनाला पाठविला गेला होता. त्या अहवालावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. असा आरोप या आंदोलकांनी केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.