Crimes : येरवडयात अट्टल घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या २४.तासात आवळल्या मुसक्या ४.लाखांचा मुद्देमाल जप्त.

पुणे.दिनांक २४.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम )२२जून रोजी येरवडयातील मच्छी मार्केट जवळील चित्रा चौकातील अक्षय अपार्टमेंट मध्ये घरफोडी व चोरी झाल्याच्या समजतात गुन्हे शाखा युनिट ४.चे पथकाने तपास करून घटना स्थळाचे व्यवस्थित निरीक्षण करून सी. सी.टिव्ही फुटेज च्या माध्यामातून तपास करून आरोपीच्या २४.तासाच्या आत मुसक्या आवळून ४.लाख रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या व घरफोडी करणाऱ्या चोरटयाचे नाव विजय अरविंद गणबोटे. ( वय ५३.राहणार. तुळजा भवानी बिल्डिंग येरवडा पुणे )असे आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की पोलीसांनी खबऱ्याला अक्षय अपार्टमेंट मधील फुटेज दाखविले असता फुटेज मधील संशयीत व्यक्ती हा नेताजी सुभाषचंद्र बोस पुताळया जवळ लाल रंगाच्या स्कुटी सह ऊभा असल्याची माहीती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीची अंगझडती घेतली .असता त्याच्या जवळ सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल. रोख रक्कम मिळून आली या बाबत त्याच्या कडे चौकशी केली असता त्यांनी असमाधानकारक अशी उत्तरे दिली. त्यानंतर पोलीसांनी त्याला येरवडयातील गुन्हे शाखेत आणले.
व त्याचीशी सविस्तर चर्चा केली असता त्यांने आपण मच्छी मार्केट मधील चित्रा चौकातील अपार्टमेंट मधील फ्लॅट बंद असताना कटावणी च्या सहाय्याने कंडी कोंयडा तोडून घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने मोबाईल फोन व रोख रक्कम असा ऐवज चोरल्यची कबुली दिली आरोपीच्या लाल रंगाच्या स्कुटी च्या डिकी मधून कटावणी स्क्रू ड्रायव्हर मिळून आला आहे. पोलीसांनी एकूण ४. लाख रूपायांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली आहे .सदर आरोपी च्या विरोधात सन २००१.पसून पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरी व घरफोडी चे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ७००\२००७.मध्ये दाखल होता त्यात त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली असून त्या गुन्हयात शिक्षा भोगून तो सध्या बाहेर आला आहे. सदर घरफोडीची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक. अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे. पोलीस उपायुक्त गुन्हे.शाखा. अमोल झेंडे. सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर. येरवडा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव. पोलीस अंमलदार. विठ्ठल वावहाळ .रमेश राठोड. वैभव रणपिसे. अमोल वाडकर यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.