Mumbai Accident News : वरळी सी लिंकवरील टोलनाक्यावर झालेल्या भीषण अपघातात इनोव्हा कारने ६ ते ७ कारला धडक दिल्याने अपघातात तीनजणांचा मृत्यू सहाजण गंभीर जखमी

पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील वरळी सी लिंकवर टोल नाक्यावर गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मोठा भीषण अपघात झाला.टोल नाक्यावर थांबलेल्या ६ ते ७ वाहनांना पाठी मागून भरघाव वेगाने आलेल्या इनोव्हा कारने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे यात एकूण सहाजण जखमी झाले आहेत.यात दोन महिलांचा समावेश आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंबईतील सी लिंकवरील टोलनाक्यावर टोल साठी अनेक कार ह्या टोल भरण्यासाठी थांबल्यानंतर पाठी मागून भरघाव वेगाने आलेल्या इनोव्हा कारने यात ५ ते ६ वाहनांना पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन कारचा यात चुराडा झाला आहे.यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य सहाजण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघातात इनोव्हा कारचा चालक देखील गंभीर रित्या जखमी झाला आहे.अपघात नंतर या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.या मृतात दोन महिलांचा समावेश आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.