Crime : मुंबई ते आग्रा महामार्गावर पळासनेर गावा नजीक भीषण अशा अपघातात. ५.जणांचा चिरडून मृत्यू

पुणे दिनांक ४.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावा नजीक भीषण अशा अपघातात झाला असून कंटेनर चा ब्रेक फेल झाल्याने कंटेनर चक्क एका हाॅटेल मध्ये घुसल्याने या.भीषण अपघातात ५.जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तर १५ते २० जण जखमी झाले आहेत. यात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघात घटना स्थळावर पोलीस दाखल झाले आहेत.
दरम्यान आता मदत कार्य चालू असून जखमींना तात्काळ उपचारा करिता हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात येत आहे. व त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अपघात पाहणार्यानी सांगितले की कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणी चालंकाचा कंटेनर वरील ताबा सुटला व तो सरळ हाॅटेल मध्ये घुसल्याने अपघात झाला. यात ५.जणांचा मृत्यु झाला असून अन्य १५ते २०जण जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी १२.वाजण्याच्या सुमारास झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.