मराठा समाजाच्या वतीने माळेगाव साखर कारखाना व पोलिस ठाण्याला रितसर पत्र : बारामतीत मराठा समाज आक्रमक अजित पवार यांना माळेगावच्या साखर कारखान्यात मोळी टाकण्यांच्या कार्यक्रमाला कारखान्यात जाऊ देणार नाही

पुणे दिनांक २५ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाज आता संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन पेटून उठला आहे.आता शिंदे सरकारची कोणतीच चल्लाखी व राजकीय डावपेच येथून पुढे चालणार नाही.मराठा समाजाला प्रत्येक वेळी गुहित धरणं हे शिंदे सरकारला कठीण जात आहे . नेहमी मराठ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न सर्वच सरकार यांनी केला आहे.विषेश म्हणजे यात मराठा समाजाच्या सर्वंच राजकीय नेत्यांचा यात समावेश आहे.यात आतापर्यंत झालेले सर्वच मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री राज्यांचे विविध खात्यांचे मंत्री.विरोधी पक्षनेते यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन मराठा समाजाची एक प्रकारे बोळवण केली आहे.आता ह्या सर्व गोष्टी संपल्या आहेत. हाच धागा पकडून बारामतीत माळेगावच्या साखर कारखाना मळी टाकण्यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येऊ नये म्हणून मराठा समाजाच्या वतीने साखर कारखाना व माळेगावच्या पोलिस ठाण्यात रितसर पत्र दिले आहे . काही झाले तरी अजित पवार यांना या साखर कारखाना येथे जाऊ देणार नाही.
दरम्यान आता संपूर्ण महाराष्ट्रात साखर कारखान्याचे बाॅयलर पेटले असून या साखर कारखान्यात मोळी टाकण्यांचा कार्यक्रम सुध्दा जोरात सुरू आहे.पण जसा साखर कारखान्याचे बाॅयलर पेटले तसं राज्य सरकारला ४० दिवसांचा कालावधी देऊन देखील शिंदे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेळकाढूपणा करत आहे.त्यामुळे आता मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठला आहे.दरम्यान २८ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते बारामती तालुक्यात माळेगावच्या साखर कारखाना येथे मोळी पूजन होणार आहे.या कार्यक्रम स्थळी अजित पवार यांना येऊ देणार नाही.असा गंभीर स्वरूपाचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.एकंदरीत मराठा समाजाचे आंदोलन आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले आहे.मराठा समाजाच्या मागण्या बाबत हे सरकार गंभीर नाही असे यापूर्वी झालेल्या आंदोलनांवरून दिसत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.