शिवसैनिकांची मराठा आंदोलंकानी धुडकावली विनंती आक्रमक होत हाॅटेल बाहेर केले आंदोलन दौंड सोडण्याची केली मागणी : दौंड मध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक खासदार संजय राऊत यांना अडवून प्रचंड घोषणाबाजी

पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) उध्वव ठाकरे गटाचे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे दौंड येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या हाॅटेल मध्ये पत्रकार परिषद घेत असल्याची माहिती मराठा समाजाच्या आंदोलंकाना मिळाल्यानंतर नंतर आंदोलंकानी हाॅटेल येथे जाऊन शेकडो कार्यकर्ते यांनी संजय राऊत यांच्या विरोधात प्रचंड प्रमाण वर आक्रमक होत घोषणाबाजी केली.तुम्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी असतांना दौंड मध्ये का आले तुम्ही तातडीने दौंड येथून निघून जा असा पवित्रा घेतला व त्यांना घेराव घातला.
दरम्यान यावेळी स्थानिक शिवसैनिकांनी मराठा समाजाच्या आंदोलंकाना विनंती केली की संजय राऊत हे आंदोलन स्थळी भेट घेणार आहेत.पण यावेळी संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलंकानी ही शिवसेनेची विनंती धुडकावून लावली आहे.व संजय राऊत ज्या हाॅटेल मध्ये थांबले होते तेथून काही अंतरावर आंदोलक हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून साखळी उपोषण करत आहेत.यावेळी आंदोलक हे संत्प्त होत राऊत व आमचे काय भांडण नाही.त्यांनी आमच्या मराठा समाजाच्या मोर्चा ला मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हटले आहे.संपूर्ण महाराष्ट्रात नेत्यांना गावबंदी असून तुम्ही दौंड तालुक्यात येऊन पत्रकार परिषद घेता ही तुमची मोठी चुक आहे.त्यामुळे आम्ही विनंती करतो की तुम्ही पाच मिनिटांत दौंड येथून ताबडतोब निघून जा.अन्याथा मराठा समाजाच्या रोषाला व आक्रोशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.जर विश्रांती साठी आला असाल तर मराठा आंदोलन स्थळी उपोषणकर्ते यांच्या बरोबर चर्चा करायची होती असे म्हणत मराठा समाजाच्या आंदोलंकानी त्यांना खडेबोल सुनावले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.