वेळकाढूपणा करणांऱ्या समितीचा धिक्कार असो.गो बॅक गो बॅक दिल्या घोषणा : धाराशिव मध्ये मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक, चक्क शिंदे समितीचीलाच दाखविले काळे झेंडे

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेला आहे.दरम्यान राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या हेतूने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केली आहे.ही समिती आज धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली ही समिती जिल्ह्यात येत असल्याने मराठा आंदोलनाचा पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.दिवसभर समितीने दिवसभर कागदपत्रांची छानंनी केली व काम आटोपून जात असताना आंदोलंकनी त्यांना अडवण्याचा प्रर्यत्न केला.
दरम्यान यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना आज धाराशिव येथे काळे झेंडे दाखवून वेळकाढूपणा करणांऱ्या समितीचा धिक्कार असो.गो बॅक गो बॅक अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.त्यामुळे काहीकाळ येथील वातावरणात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांनी तातडीने या आंदोलक कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.