Threatened : घोरपडी गावात एकास " तू पोलिसांचा खबरी आहे, तुझा आता मर्डर करतो " म्हणून दिली धमकी

घोरपडी गावातील पंचशील नगर येथे एकास "तू पोलिसांचा खबरी आहे", असे म्हणून "तुझा आता मर्डर करतो" व हातातील तलवारीने त्याच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केल्याच्या ( Threatened ) आरोपावरून पोलिसांनी एकास अटक केली आहे व त्याच्या अन्य १४. साथीदांरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदरच्या घटनेबाबत मुंढवा पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. राज राजपुत ( ३४. रा. पंचशील नगर मुंढवा गाव पुणे) हा सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याच्या मावशी समावेत सदर ठिकाणी थांबला असता. विनेश व त्याचे अन्य १४. साथीदारांनी राज याला तू पोलिसांचा खबरे आहे.
असे त्याला म्हणाले व तुझा आज फिक्स मर्डर करून टाकतो असे त्याला म्हणून त्याच्या डोक्यात तलवारीने ( Threatened ) वार केला. पण सदरचा वार राज येणे चुकून मावशीच्या घरात जाऊन स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला व आतून दरवाजा बंद करून भीतीपोटी आताच थांबला. यावेळी आरोपींनी घराच्या लोखंडी दरवाजावर लोखंडी पाईपाने मारून तू घराच्या बाहेर ये असे म्हणून आज तुझा मर्डर फिक्स आहे अशी धमकी देऊन. दारात काचेच्या बाटल्या फोडून मावशीला धक्काबुक्की केली व तिला ढकलून दिले. सदर याप्रकरणी राज राजपूत यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर. पोलिसांनी विनेश निलेश धिवार ( वय.१८. रा. पंचशील नगर मुंढवा गाव पुणे.) याला अटक करून त्याच्या अन्य १४ साथीदांरा वर देखील गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.