Crime : फक्त २५ सेकंदात सव्वा कोटी रुपये लुटले , मग विमानांने नागपूर मधून पुण्यात आले पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ३ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) नागपूरात रोज चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याताच एक खळबळ जणक घटना घडली आहे. दोघे चोरटे दुकानात आले व आणि फक्त २५ सेकंदात तब्बल सव्वा कोटी रुपये रूपये लुटून पसार झाले. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली या घटने मुळे व्यापारी वर्गात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे सदर लुटमार प्रकरणांची घटना सी सी टिव्ही कॉमेरा मध्ये कैद झाली होती या बाबत लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून सी सी टिव्ही फुटेजच्या आधारे तपास करून आरोपींचा पुण्यातून मुसक्या आवळल्या आहेत.
या घटने बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर मवील इतवारी बाजार परिसरात मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोन आरोपी हे दुकानांत आले व शस्त्रांच्या धाक दाखवून व्यापा-याला शस्त्रांच्या धाक दाखवून १. १५ कोटी ऐवज लुटून धुम ठोकली हा प्रकार फक्त २५ सेकंदात घडला बाजारात गर्दी असून देखील हा चोरीचा प्रकार कोणाला कळाला देखील नाही. सदरच्या चोरी नंतर ते दोघे विमानातून पुण्यात दाखल झाले. सदर चोरी प्रकरणी व्यापारी यांनी लकडगंज पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्या नंतर पोलिसांनी पोलिसांकडून तत्काळ तपास करून दुकानांतील सी सी टिव्ही फुटेजच्या आधारे तपास करून आरोपींची ओळख पटवली व त्या नंतर आरोपींच्या पुण्यातून मुसक्या आवळल्या आहेत. आता या चोरीच्या घटनेत अजून कोण सहभागी आहेत का ? याचा तपास पोलिस करीत आहेत. या घटनेनंतर पोलिस पण चक्रवून गेले होते की आवघ्या २५ सेकंदात भरबाजारात गर्दीच्या ठिकाणी एवढी मोठी चोरी कशी झाली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.