मराठा आरक्षण प्ररकणी मराठा समाज आक्रमक : कोल्हापूरात मराठा समाज आक्रमक वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांना रेल्वे जंक्शनवरच अडविले

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाने राज्य सरकारला ४० दिवसांची डेडलाईन ही २४ ऑक्टोबर रोजी संपली असून मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत.आता राज्य सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर एकटावला आहे.आज कोल्हापूर येथील रेल्वे जंक्शनवरच आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांना रोखून धरले व मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत त्यांना जाब विचारण्यात आला आहे.यावेळी मराठा समाज यांच्या वतीने एकच मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.यावेळी येथील वातावरण चांगलेच तापले होते .व यावेळी मराठा समाजाचे आंदोलक व पोलिस यंत्रणा यांच्याच चांगलीच झटपट झाली होती.
दरम्यान मुंबई वरुन रेल्वे ट्रेन महाक्ष्मी एक्सप्रेसने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे आज सकाळीच कोल्हापूर येथे आले. त्यावेळी मराठा समाजाचे आक्रमक झालेले सर्व आंदोलक हे त्यांची वाट पाहत बाहेर आल्यावर मराठा समाजाच्या वतीने त्यांना तिथेच आडवले.यावेळी पोलिस व आंदोलक यांच्यात मोठ्या प्रमाणावर झटपट झाली.व सकल मराठा समाजाचे तरुण आक्रमक होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.दरम्यान राज्य सरकार व केंद्र सरकारने मराठा समाजांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे.मात्र आता मराठा समाज हा पुन्हा त्यांच्या भुलथापांना बळी पडतणार नाही.तसेच वेळ पडल्यास पालक मंत्र्यांना जिल्हा बंदी करु असा इशारा देखील मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मराठा आरक्षण बाबत मराठा समाजांचे सर्वच तरुण आक्रमक झाले आहेत.मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हातकणंगले.कागल.व राधानगरी.या तालुक्यातील काही गावांमध्ये गावबंदीचा इशारा दिला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.