कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ ... ' विश्र्वासनेच केला महिलेचा विश्र्वासघात' : मुंबईत खाकी वर्दीला मोठा डाग एटीएस अधिकाऱ्यांने गुंगीचे औषध शितपेयातून देऊन महिल्यावर केला अत्याचार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र राज्य दहशतवादविरोधी पथकातील ( एटीएस) च्या पथकातील एपीआय विश्र्वास पाटील यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संबंधित महिलाने याबाबत पोलीस अधिकारी यांच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर सदरच्या अधिकाऱ्या विरोधात पोलिसांनी पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सन २०२० मध्ये एपीआय विश्र्वास पाटील यांनी एका तपास कामा च्या अनुषंगाने मदत करणाऱ्या महिलेसोबत ओळख वाढवून तिला थंड पेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा पिडीत महिलेनं म्हणले आहे.पुढे याचे रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी ब्लॅकमेल करून अत्याचार केले. दरम्यान या सर्व गोष्टींना वैतागून या महिलेने पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.या प्रकरणी पुढील तपास आझाद मैदान पोलीस करीत आहेत.सदरचा बलात्कार हा शिवाजी पार्क परिसरात केला आहे.दरम्यान याबाबत पाटील हे ज्या खंडणी विभागात काम करत होते.त्याच मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलच्या निरीक्षक आकडे महिलेने तक्रार केल्यानंतर तेथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यां कडून तक्रार करु नका असे सांगण्यात आल्याची माहिती आझाद मैदान पोलीस स्टेशन मधील एका अधिकाऱ्यानी सांगितले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.