पायलट गंभीर रित्या जखमी : नेपाळ मध्ये हेलिकॉप्टर भरकटून 🗻 डोंगराळ भागात कोसळले

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) नेपाळ येथील मानांग एअर कंपनीचे एक हेलिकॉप्टर 🗻 डोंगराळ भागात कोसळले दरम्यान या दुर्घटनेत पायलट हा जखमी झाला आहे.याबाबचे वृत्त नेपाळच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहे.अपघात ग्रस्त हेलिकॉप्टर एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या लुक्ला येथून प्रवाशांना घेण्याकरिता जात असताना इशान्य नेपाळ येथील लोबुचे येथील हेलिपॅडवर उतरत असताना अचानक पणे भरकटले व नंतर पेट घेतला.
दरम्यान या दुर्घटनेत यातील हेलिकॉप्टरचे पायलट प्रकाश सेनानी हे जखमी झाले व त्यांना दुखापत झाली असून उपचारासाठी काठमांडू येथील रुग्णालयात उपचारा करीता दाखल केले आहे. सदरचे हेलिकॉप्टर हे अचानक पणे कसे दुर्घटनाग्रस्त झाले.याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.दरम्यान याबाबतची माहिती नेपाळचे नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाचे उपसंचालक जगन्नाथ निरौला यांनी दिली आहे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.