Crime : पुण्यातील एकाचे कर्ज फेडण्यासाठी साडे अकरा लाखांचे दागिने घेऊन फसवणूक दोघेजण गजाआड

पुणे दिनांक ८ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील हवेली तालुक्यातील नायगाव येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन ते कर्जाची रक्कम ११ लाख ४२ हजार ५०० रूपये परस्पर आपल्या खात्यात वर्ग करुन फसवणूक केल्याप्रकरणी संबंधीत व्यक्तींनी आत्महत्या केल्या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सांगितलेल्या माहिती नुसार अटक आरोपी १) सुनिल रमेश दुर्गाडे ( वय ४० ) २) रविन्द्र रमेश दुर्गाडे ( वय ३१ रा. तुकाईदर्शन.भेकराईनगर.फुरसुंगी पुणे) या दोघा भावांनविरुध्द लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कुंदा चौधरी यांनी फिर्याद दिली आहे.त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.दरम्यान या दोघा भावांनी मिळून कुंदा यांचे पती गुलाब चौधरी यांना १७ फेब्रुवारी २०१८ ते २९ जुलैच्या दरम्यान यांना कर्ज त्यांच्या नावावर काढले व त्यांना कर्जाची रक्कम ११ लाख ४२ हजार ५०० रुपये न देता ती रक्कम परस्पर आपल्या बॅक खात्यात वर्ग करुन घेतली होती.
व परत सदरची कर्जाची रक्कम परत फेडण्यासाठी चौधरी यांच्या कडून सोन्याची दागिने घेतले व ते गहाण ठेवून त्यांच्यावर घेतलेली रक्कम बँकेत जमा न करता व चौधरी यांना न देता त्यांची फसवणूक केली.व पैसे मागितले असता त्यांना दमदाटी केली.व मानसिक त्रास देत फसवणूक केली या सर्व गोष्टींना कंटाळून गुलाब चौधरी यांनी आत्महत्या केली.या बाबत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी या दोघा भावांना विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.