Crime : फलटण मध्ये बेवड्या पोलीस निरीक्षकांने दोन युवकांना उडविले. गाडीत सापडली दारूची बाटली.

पुणे दिनांक ६ जून ( पोलखोल नामा न्युज टीम) फलटण मध्ये पोलीस निरीक्षकांनेच रफ व फास्ट डायव्हिंग करून दोन युवकांना उडविले. सदरच्या अपघाता नंतर पोलीस निरीक्षक मद्यधुंद अवस्थेत होता.असे समजते.
घटना स्थळा वरून सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार सदर घटना ही सोमवारी रात्री घडली असून अपघाता नंतर घटना स्थळी जमलेल्या जमावाने मद्यधुंद पोलीस निरीक्षकांना चांगलाच प्रसाद दिल्याचेही चर्चा आहे.मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव दादासाहेब पवार असून. वरिष्ठांकडून त्यांची बद्दली फलटण पोलीस ठाण्यातून सातारा पोलीस मुख्यालयात कंट्रोल रूम मध्ये केल्या मुळे पोलीस निरीक्षक महाशय डिप्रेशन मध्ये होते..त्यातच त्यांनी दारू ढोसून मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून दोन युवकांना उडविलयाचे कळत आहे.सदर अपघातात दोन युवक जखमी झाले आहेत.
सदर अपघात प्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास फलटण पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.