Crimes : पुण्यात सेवा निवृत्त जवाना कडून कौटुंबिक कलह मधून बारा बोरच्या बंदुकीतून पुतण्यावर गोळीबार सुदैवाने पुतण्या वाचला

पुणे दिनांक १७ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या लोणी काळभोर येथे धक्का दायक घटना घडली असून सैन्य दलातून सेवा निवृत्त झालेल्या काकाने कौटुंबिक कलह मधून आपल्या कडील बारा बोरच्या बंदुकीतून पुतण्यावर गोळीबार केला आहे.या घटना मध्ये सुदैवाने पुतण्या वाचला असून त्यांने काकांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी काकांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या सेवा निवृत्त जवानांचे नाव प्रदिप तुकाराम जाधव ( वय ४४ रा.लोणी काळभोर पुणे सोलापूर रोड पुणे) असे काकांचे नाव आहे.या प्रकरणी पुतण्या विकास जाधव ( वय २४ ) यांने या घटनेची फिर्याद लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये दिली आहे.प्रदिप- विकास हे दोघेजण नात्याने काका -पुतणे आहेत व ते शेजारीच राहतात यांच्यात असलेल्या कौटुंबिक कलह मधून सैन्य मधून सेवा निवृत्त झालेल्या काकांनी त्यांच्याकडे असलेल्या परवाना धारक बारा बोरच्या बंदुकीतून पुतण्या विकास यांच्यावर तीन राऊंड फायर केले यात सुदैवाने विकास हा वाचला आहे.या घटनेची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी काका विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.या बाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक खोसे हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.