पुण्यात वाहनतोडफोडचे सुरूच २८ वाहने कोयत्याने फोडली : पुण्यात वाहनतोडफोडीचे सत्र सुरूच कोयत्याने फोडली २८ वाहनं या बाबत पोलिसांनी आवळल्या तिंघाच्या मुसक्या

पुणे दिनांक ७ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील वाहनतोडफोडीचे सत्र सुरूच आहे.ते थांबण्याची शक्यता आता कमी होत असून अल्पवयीन मुलांवर पुणे पोलिसांनी कठोर शिक्षा करुन देखील सुध्दा ह्या घटना सातत्याने पून्हा पून्हा घडतच आहेत.काल पुन्हा अशी घटना लोहगाव येथे घडली असून तीन जणांनी मिळून २८ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.यात पुणे पोलिसांनी तिंघाच्या मुसक्या आवळल्या आहेत.यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पुण्यातील लोहगावातील कालवड व थिटे वस्ती येथे दोन अल्पवयीन मुले व अन्यएकजण असे तिंघानी मिळून या भागातील तब्बल २८ वाहनांची तोडफोड केली आहे.या मध्ये या तोडफोडमोड अल्टो.इनोव्हा.एॅसेंट व होंडा सिटी गाड्यांचा समावेश आहे.यात दुचाकीवरुन तींघेजणांनी येऊन हातात कोयता घेऊन दहशत माजवली व या वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे.याबाबत पोलिसांनी तिंघावर गुन्हा दाखल करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.अटक करण्यात आलेल्या तिंघाची नावे १)अली शौकत २) अली अन्सारी ३) हसिम खलील शेख या प्रमाणे आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.