सिक्कीम मध्ये ढगफुटी नंतर जनजीवन विस्कळित : सिक्किममध्ये ☁️ ढगफुटी मुळे पूर यात भारतीय लष्कराचे २३ जवान बेपत्ता शोधमोहीम युद्ध पातळीवर सुरू

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सिक्किममध्ये आज पहाटे अचानक पणे ढगफुटी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे तीस्ता नदीला प्रचंड प्रमाणावर महापूर आला आहे.या महापूरत भारतीय लष्कराचे एकूण २३ जवान बेपत्ता झाले आहेत. या नंतर लष्कराच्या प्रशासनाच्या वतीने या भागात युद्ध पातळीवर शोध मोहीम व बचाव कार्य सुरू केले आहे.दरम्यान अचानक पणे झालेल्या ढगफुटी नंतर सिक्किम मधील जनजीवन विस्कळित झाले आहे.यामुळे प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान याप्रकरणी गुवाहाटी मधील संरक्षण खात्याच्या पीआरओंनी दिलेल्या माहितीनुसार अचानक पणे झालेल्या ढगफुटी नंतर उत्तर सिक्किम मधील लोनाक तलावाला अचानक पणे मोठा पूर आला त्यामुळे २३ जवान बेपत्ता आहेत.चुंगथांगा धरणातून पाणी सोडले गेले आहे.पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे सिंगतामजजवळील बारडांग येथे उभी असलेली लष्करी वाहने वाहून गेली आहेत.यात ४१ वाहनांचा समावेश आहे.तर या पूरात २३ जवान वाहून गेले आहेत.लष्काराच्या वतीने शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.