पिंपरी चिंचवड नंतर सोलापूरात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण : सोलापूर मध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न,भीम आर्मीचा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

पुणे दिनांक १५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील हे प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आहेत यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्यावर शाईफेक करण्यांचा प्रयत्न केला.व काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली.यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांला ताब्यात घेतले आहे.अजय असे त्याचे नाव असून सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण व कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
दरम्यान चंद्रकांत पाटील यांचा दोन दिवस सोलापूर जिल्ह्याचा दौरा आहे.दरम्यान शासकीय विश्रामगृहात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर हा शाईफेक करण्यांचा प्रयत्न करण्यात आला आहे.यावेळी कंत्राटी भरती विरोधात या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.तर काळे झेंडे दाखवण्यांचा प्रयत्न केला.दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे विश्रामगृहात येणार म्हणून या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यामधून देखील या कार्यकर्त्यांने पुढे जाऊन शाईफेक करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान या आधी देखील महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल पिंपरी चिंचवड येथे देखील तेव्हा पुण्याचे पालकमंत्री असताना पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला गेला होता.दरम्यान राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणाऱ्या कंत्राटी भरती बाबत राज्यभरात प्रचंड विरोध आहे.त्याचाच विरोध भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांने करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यांचा प्रयत्न केला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.