ससून रुग्णालयात बंदोबस्ताकरीता असणाऱ्या पोलिसांना दिला दणका : ड्रग्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार फरार प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांकडून त्वरित दखल दहा पोलिसांचे तडका फडकी निलंबन

पुणे दिनांक ३ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) येरवडा कारागृहातील आरोपी ससून रुग्णालयात उपचार घेणारा ड्रग्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार व ससून रुग्णांलयातून ड्रग्सचं रॅकेट चालवणारा आरोपी ललित अनिल पाटील यांने सोमवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी रात्री पोलिस बंदोबस्तात धूम ठोकली होती.या घटनेची पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी तातडीने दखल घेतली आहे.व वार्ड क्रमांक १६ मध्ये ड्यूटीवर तैनात असणारे एकूण दहा पोलिस कर्मचारी यांचे तातडीने निलंबन केले आहे.यात एक पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
दरम्यान याप्रकरणी निलंबन केलेल्या पोलिस कर्मचारी यांची नावे ASI रमेश जनारदन काळे.विशाल बाबुराव.स्वप्निल चिंतामन. दिगांबर विजय चंदन.पीएसआय मोहिनी डोंगरे.हवालदार आदेश सिताराम.नाथाराम भारत काळे.दत्तू बनसोडे.अमित सुरेश जाधव. अशी आहेत.ससून रुग्णांलयातून ललित अनिल पाटील हा ड्रग्सचे रॅकेट चालवत असल्या बदलची माहिती पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.तो ससून रुग्णालयात चार महिन्यांपासून शाही थाटात ससून रुग्णांलयाचे प्रशासन.व पोलिस प्रशासन व येरवडा कारागृहाचे प्रशासन यांच्या पाठिंब्यामुळे पळून गेला म्हणतात पण पाटील हा चालत चालत पुणे स्टेशनकडे गेल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.म्हणजे यात ड्यूटीवर असलेले पोलिस काय करत होते.त्यांचा हलगर्जीपणाच आरोपीला पळविण्यासाठी होता का ? या ड्रग्स रॅकेट मध्ये अन्य आरोपी यांची नावे व मोठे मासे जाळ्यात अडकू नये म्हणून याला पळविण्यासाठी मदत करण्यात आली का ? असे चित्रच यामागे दिसत आहे.येरवडा कारागृहात अनेक गरीब बंदी हे उपचारा वाचून वंचित आहेत.पण पाटील सारख्या ड्रग्स रॅकेट चालविण्यासाठी त्याला तब्बल चार महिन्यांपासून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.याला असा कोणता गंभीर आजार झाला होता.हे एक कोडं आहे.यामागे पाटील याला मद्दत करणाऱ्यांत मोठे रॅकेट आहे.हे सिध्द होते?
यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता मोठी शंका सर्वंच थरावर घेतली जात आहे.यामुळे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी तातडीने या प्रकरणी दखल घेत संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई केली आहे.पोलिस आयुक्त यांनी दखल घेतली पण येरवडा प्रशासन व ससून रुग्णालयाचे प्रशासन अशीच गंभीर दखल घेऊन पाटील याला मदत करणाऱ्यां वर कारवाई करणार का ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.