Crimes : पोलीस भरतीत डिवाइस द्वारे काॅफी प्रकरणी पोलीसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पुणे.दिनांक ३०.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) मुंबई पोलीस भरतीत लेखी परिक्षेत काॅफी प्रकरणी आणखी दोघा जणांच्या मुसक्या मेघवाडी पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांची नावे १) अंकूश काळे व २) बंडू दुबे अशी आहेत. या दोंघा जणांना न्यायालयात हजर केले आहे
मुंबई पोलीस खात्यात पोलीस शिपाई पदा करिता भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मैदाणी परीक्षे नंतर पात्र झालेल्या एकूण ८३.हजार ७४६.उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली होती.या साठी ७.मे रोजी मुंबई येथील जोगेश्वरी मधील एकूण २५१.केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. या वेळेस जोगेश्वरी केंद्रावरील एक विद्यार्थी हा सारखी चूळ बूळ करीत होता. त्याची चौकशी केली असता त्याच्या कडे डिवाइस आढळून आला.
काॅफी प्रकरणी त्याच्या विरोधात त्याच्या विरोधात मेघवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. होता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मांढरे यांच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास केला असता. सदर तपासात त्यांना माहिती मिळाली की यातील काही संशयित बीड जिल्ह्य़ातील आहेत. त्या नंतर त्यांनी बीड मध्ये चौकशी दरम्यान लहू या इसमा कडून बंडू व अंकूश या दोघांची नावे निष्पन्न झाली. त्या दोघांच्या मुसक्या आवळून त्यांना मुंबई मधील न्यायालयात हजर केले. या प्रकरणी पुढील तपास मेघवाडी पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.