Crime : ऑनलाईन गेमिंग फसवणूक प्रकरणी बुक्कीच्या घरात पुन्हा सापडले साडेसोळा कोटींचे घबाड

पुणे दिनांक ३ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) नागपूर मधील एका व्यापा-या ऑनलाईन गेमिंगच्या मोहात फसवून त्याची ५८ कोटी रूपयांची लूट करण्या-या एका बुक्कीच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून या छाप्यात पुन्हा साडेसोळा कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात सोने व चांदी .रोक्कडचा समावेश आहे. अंनत उर्फ सोंटू असे आरोपीचे नाव असून तो पोलिसांच्या भिंतीने दुबाईला पळून गेला आहे.
दरम्यान ऑनलाईन गेमच्या मोहात अडकलेल्या एका व्यापा-यांने ५८ कोटी रूपये गमावले आहेत. त्यानंतर उघडकीस आलेल्या या गोरखधंद्याचा मास्टर माइंड अंनत उर्फ सोंटू जैनच्या गोंदिया मधील निवसस्थानी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १६ कोटी ५९ लाख रूपायांची रोकड १२ किलो सोन्यांची बिस्किटे व २९४ किलो चांदी.जप्त केली होती त्यानंतर आता पुन्हा साडेचार कोटीचे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. आरोपी अंनत उर्फ सोंटू जैनच्या लाॅकर मधून साडेचार कोटीचे सोने जप्त केले आहे. त्यामुळे आता पर्यत जप्त केलेल्या एकूण मुद्देमालची किंमत ३१ कोटी रूपये इतकी झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.