Crime : पिंपरी चिंचवड शहरात रूपी नगर मध्ये कोयता गॅगचा धुमाकूळ

पुणे दिनांक ९.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)पिंपरी चिंचवड मध्ये कोयता गॅगचा धुमाकूळ चालूच आहे या मुळे या भागातील नागरिकांन मध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे. पोलीसांनी त्वरित या कोयता गॅगचा बंदोबस्त करावा व या गॅग पसून नागरिकांचे संरक्षण करावे असे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटने बाबत स्थानिक नागरिकांनी सांगितले की पिंपरी चिंचवड शहरातील रूपीनगर परिसरातल्या जुन्या बस स्टॉप जवळ कोयता गॅगने ७ ते ८ वाहनांची व एका कापड दुकानांची तोडफोड केली आहे. या घटनेचा सी सी टिव्ही. फुटेज सोशल मिडीया वरून व्हायरल होत आहे.
दरम्यान या व्हायरल व्हिडिओ मुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसरात नागरिकांन मध्ये प्रचंड भिंतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी या प्रकरणाची पोलीसांनी त्वरित दखल घ्यावी व या कोयता गॅगचा बंदोबस्त करावा. व या वर संपूर्ण परिसरात पोलीसांची गस्त वाढवावी. अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
दरम्यान सूत्रांनच्या द्वारे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री १०.वाजण्याच्या सुमारास कोयता गॅगने कोयात व लाकडी दांडके आणी लोंखडी राॅडच्या सहाय्याने तोडफोड केली व कापड दुकानावर हल्ला केला या हल्ल्यात दुकानदार किरकोळ दुखापत झाली आहे. व तेथील गाड्यांची तोडफोड केली आहे. या पूर्वी पण असाच प्रकार या भागात झालेला आहे. पार्क करण्यात आलेल्या गाड्यांना या वेळी लक्ष करण्यात आले आहे.
कोयता गॅगने केलेल्या तोडफोड प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सी सी टिव्ही फुटेजच्या मदतीने तपास चालू करण्यात आला आहे. या भागातील नागरिक कोयता गॅगचा दहशती च्या सावाटात आहे. या भागात काल झालेल्या घटना मुळे व्यापारी वर्ग दहशतीत आहे. या घटनेच्या निषेधार्थ व्यापा-यांनी आपली दुकाने आज पूर्ण पणे बंद ठेवली आहेत.या कोयता गॅगचा पोलीसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक व्यापरी व नागरिकांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.