मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली घटना : मध्यरात्री खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवकाच्या घरात घुसून त्याच्यावर तीन गोळ्या झाडून एकाचा खून पुणं हादरलं

पुणे दिनांक ३०ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एकाच्या घरात घुसून रिव्हालवर मधून तीन गोळ्या झाडून एकाची हत्या केली आहे. दरम्यान या गोळीबाराच्या घटने नंतर या परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेने पुणे हादरले आहे.
दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार घोरपडे पेठ येथील सिंहगड गॅरेज चौकात अनिल साहू ( वय ३५) हा राहत होता रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरात शिरुन रिव्हालवर मधून तीन गोळ्या झाडून साहू यांची हत्या केली आहे.दरम्यान या घटनेची माहिती खडक पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.