Crime : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात विहिरीचे काम चालू असताना मातीच्या ढिगा-या खाली अडकले ४ कामगार बचाव कार्य सुरू

पुणे दिनांक २ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीचे रिंग टाकण्याचे काम हे मंगळवारी १ ऑगस्ट रोजी चालू असतांना अचानकपणे मातीचा ढिगारा विहिरीत पडून झालेल्या दुर्घटना मध्ये खाली विहिरीत ८० फुट काम करणारे एकूण ४ कामगार या मातीच्या ढिगारा-या खाली अडकले आहेत. ही घटना काल दुपारी घडली असून काल रात्री पसून बचाव कार्य चालू आहे.
याबाबत सूत्रांनच्या द्वारे कळत आहे की काल पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे शेतात विहिरीचे काम चालू होते. सदरची विहिर ही ८० फुट खांदून पुर्नं झाली होती १ ऑगस्ट मंगळवारी या विहिरीला रिंग टाकण्याचे काम हे चालू होते .सदरचे काम चालू असतानांच अचानकपणे विहिरीच्या कडेला असलेला मातीचा ढिगारा अचानकपणे विहिरीत पडल्या मुळे काम करण्या-या ४ कामगार हे या ढिगा-या खाली अडकले आहेत. या कामगारांना वाचविण्यासाठी रात्रभर पाच पोकलेन मशीनच्या सहाय्याने विहिरीत पडलेला मातीचा ढिगारा हटविण्यांचे काम सुरू आहे.
दरम्यान ह्या बचाव कार्यात एन डी आर एफ ची टीम सहभागी झाली आहे. ते देखील हा ढिगारा उपसण्याचे काम करीत आहे.घटनास्थळी इंदापूरचे तहसीलदार देखील पोहचले आहेत. व भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देखील घटना स्थळी पोहोचलो असून बचाव कार्य चालू आहे. स्थानिक युवक देखील या बचाव कार्यात सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.