Ink thrown on minister chandrakant patil : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे चिंचवडमध्ये श्रीमंत महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवासाठी आले असताना शनिवारी त्यांच्यावर अज्ञातांनी शाई फेकली. सायंकाळी ६ च्या दरम्यान हा प्रकार घडला. त्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. चोख पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडली आहे.
पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. शाई फेकणारी व्यक्ती 'चंद्रकांत पाटील मुर्दाबाद'चा नारा देत होती. या व्यक्तीचे नाव अद्याप समजलेले नाही. श्रीमान महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त पाटील हे चिंचवड गावात होते, त्यावेळी त्यांना काळे झेडेही दाखवण्यात आले.
पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशा घोषणा देत त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो वाहून नेले. हे फोटो दाखवत पाटील यांना काळे झेंडे दाखवले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने राज्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस विविध शहरांमध्ये आंदोलन करत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.