Pune city case : पुणे शहर केस मागे घेण्याचे नावाखाली 40 लाख रुपयाची खंडणी मागणारा इराणी आरोपी जेरबंद

महिला व त्यांचा मुलगा यांना अंजुमन इराणी ग्रुपचा सदस्य असल्याचे सांगुन फर्जान फख्राबादी हा 40 लाख रुपयाची वारंवार खंडणीची मागणी करीत असुन, दिनांक 06/10/2022 रोजी देखील तीन अनोळखी इसमांनी दुचाकीवर येवुन गाडी थांबवुन त्यांना 40 लाख रुपये दया,नाहीतर तुम्हाला बघुन घेवुन अशी धमकी दिल्याने,त्यांनी सदरबाबत लेखी तक्रारी अर्ज दिला होता.
सदर अर्जाची तात्काळ दखल घेत गुन्हे शाखा,युनिट-2 चे प्रभारी क्रांतीकुमार पाटील यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांची एक टिम तयार करुन सदर इसमाबाबत काहीएक सुगाव नसतांना,अंजुमन इराणी ग्रृपचा सदस्य फर्जान फख्राबादी यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याचे नाव फर्जाद मोहम्मद रिझा फख्राबादी,वय-31 वर्षे,रा.फ्लॅट नं.503, सुप्रीम क्लासिक,सांळुखे विहार,एन.आय.बी.एम.कोंढवा,पुणे असे सांगितले.
फर्जाद मोहम्मद रिझा फख्राबादी यास विश्वासात घेवुन त्याचेकडे सखोल तपास करता,त्याने फिर्यादी यांचे मुलावर सन 2018 मध्ये दाखल झालेल्या गुन्हयातील फिर्यादी हया त्याची मैत्रिण असुन तीला मी केस मागे घेण्यास सांगतो असे खोटे कारण सांगुन,फिर्यादी यांचेकडुन 40 लाख रुपयेची खंडणी मागीतली असल्याचे सांगितल्याने,त्याचेविरुध्द कोरेगांव पार्क पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.110/2022,भा.द.वि.कलम 384,504,507 अन्वये गुन्हा दाखल केला असुन,सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहा.पो.निरी.विशाल मोहिते हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त, श्री.संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त,गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, सहा.पो.आयुक्त,गुन्हे-1,श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,क्रांतीकुमार पाटील, सहा.पो.निरी.विशाल मोहिते, पोलीस अमलंदार, संजय जाधव, उज्वल मोकाशी, मोहसीन शेख, गजानन सोनुने, साधना ताम्हाणे, समिर पटेल, निखील जाधव, कादीर शेख यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.