जिल्हा वकील संघाकडून आंदोलकांना पाठिंबा : जालना ३३ मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी;

पुणे दिनांक ३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना मध्ये आंतरवली सराटी गावात उपोषण साठी बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता.यात एकूण २७० आंदोलकांनावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.याचा निषेध करण्यासाठी पून्हा मराठा संघटनांनी आज आंदोलन केले होते.त्यापैकी आज ३३ आंदोलंकाना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आता या आंदोलकांना जामीना करीता अर्ज न्यायालयात करता येणार आहे.
दरम्यान या आंदोलंकाना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता या मराठा समाजाच्या आंदोलंकाना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपल्या भावना शासनाच्या प्रती व्यक्त करीत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले होतं.परंतू पोलिसांनी पून्हा आंदोलन कर्ते यांना मारहाण करीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.यात गुन्हे दाखल झालेल्या सर्व मराठा समाजाच्या आंदोलंकांच्यावरील गुन्ह्या बाबत जिल्हा वकील संघ लढणार असल्याची माहिती वकील संघाकडून वतीने आज देण्यात आली आहे.या सर्व मराठा समाजाच्या पाठीमागे जालना वकील संघटना खंबीर पणे उभी राहणार आहे.अशी माहिती वकील संघाकडून देण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.