जालन्यात धनगर समाज आक्रमक : जालना जिल्हाधिकारी यांनी धनगर समाजाचे निवेदन स्वीकारले नाही.जिल्हाधिकारी कार्यलयावर दगडफेक

पुणे दिनांक २१ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना मध्ये जिल्हाधिकारी यांनी धनगर समाजाचे निवेदन स्वीकारले नाही.धनगर समाजांचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्या साठी आले होते.परंतू वाट बघून देखील जिल्ह्याधिकारी निवेदन घेण्यासाठी खाली आले नाही.त्यामुळे मुजोर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर न आल्यामुळे संतप्त झालेल्या धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली आहे.
दरम्यान संतप्त झालेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जिल्ह्याधिकारी कार्यलयावर प्रचंड दगडफेक केली व कार्यालयातील दुचाकी फोडल्या तसेच जिल्हाधिकारी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.दरम्यान यात शासनाच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत.धनगर समाज आज दुपारी चार वाजता निवेदन देण्यासाठी गेले व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी आजच्या मोर्चा बाबत सांगितले होते.तरी त्यांनी मुजोर गिरी करत धनगर समाजाचे निवेदन स्वीकारले नाही.त्यामुळे हा जमाव मोठ्या प्रमाणावर उग्र होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड प्रमाणावर दगडफेक केली आहे.दरम्यान न्यूज लिहिण्याप्रर्यत देखील पोलिस व आंदोलनकर्ते हे जिल्ह्यधिकारी यांच्याकडे निवेदन घेण्यासाठी त्यांना विनंती करत होते.पण त्यांनी निवेदन स्वीकारले नाही.असे समजते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.