मुंढवा अतिक्रमण कारवाई : मुंढवा ओव्हर ब्रीज ते मुंढवा चौक येथील ३२ वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणवर पुणे मनपा व पोलिस यांची संयुक्त कारवाई

पुणे दिनांक १९ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे महापालिकेच्या हद्दीतील मुंढवा चौक येथील ३२ वर्षांपासून रखडलेल्या रस्ता रुंदीकरणां साठी कारवाई पुणे शहर पोलिस व महानगरपालिका व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान मुंढवा ओव्हर ब्रीज ते मुंढवा चौक या भागात असलेल्या अतिक्रमण बाबत दिनांक १८ व १९ या कालावधीत पुणे महापालिकेच्या भुसंपादन विभाग यांच्याकडून अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे.हडपसर- खराडी मुख्य रोडवरील मुंढवागाव लगत असलेल्या मुंढवा चौक येथील भुसंपादन जागेवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती.या कारवाईस स्थानिकांचा विरोध होता.त्यामुळे ही कारवाई प्रलंबित होती.
दरम्यान पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या औद्योगिकरण व मुंढवा - केशवनगर भागामध्ये वाढलेल्या वाहतूक मुळे याभागातील हडपसर - खराडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने याभागातील नागरिकांनसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती.यासाठी समस्याचे निरासन करण्यासाठी पुणे शहर पोलिस व पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व स्थानिक प्रतिष्ठीत नागरिक व कार्यकर्ते.कोद्रे . लोणकर.गायकवाड.झुरंगे. व स्थानिक नागरिक यांच्या बरोबर वेळोवेळी चर्चा केली.स्थानिक नागरिकांना सोबत झालेल्या चर्चेनंतर शंका निरासनानंतर नागरिकांनी कायदेशीर कारवाईस सहकार्य करण्याचे ठरविले.
दरम्यान मुंढवा चौक येथील रोड रुंदीकरण अतिक्रमण कारवाई पुणे पोलिस, महानगरपालिका, अतिक्रमण विभाग,रस्ते विभाग यांच्या संयुक्त कारवाई व स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य व मदतीने अतिक्रमण कारवाई शांततेत पार पडली आहे.सदर ठिकाणच्या अतिक्रमण कारवाई मुळे २४ मीटर रुंद रस्ता पुर्ण झाला आहे. त्यामुळे मुंढवा चौक येथे नेहमी पेक्षा एक लेन वाहतूकीसाठी उपलब्ध झाली असल्याने स्थानिक नागरिक व पुणेकरांची काही प्रमाणात वाहतूक कोंडी मधून मुक्तता होणार आहे.
सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा , महानगरपालिका अति.आयुक्त.पुणे मनपा विकास ढाकणे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ५.पुणेशहर विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त हडपसर विभाग अश्र्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हणे.पोलिस निरीक्षक गुन्हे.प्रदिप काकडे.११ अधिकारी व ५० अंमलदार तसेच पुणे महापालिकेचे अधिकारी एस.ई.दांडगे.रनावरे.श्रीमती रुपाली ढगे.हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर बाळासाहेब ढवळे व इतर अधिकारी व कर्मचारी स्थानिक नागरिकांचे सहकार्यातून कारवाई ही शांततेत पार पडली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.