Accident Death : नवले पूल ते कात्रज रोडवर जुपिटरला ट्रकची धडक ट्रकच्या चाकाखाली महिला येऊन जागीच ठार

नवले पूल ते कात्रज रोडवर जुपिटरला ट्रकची धडक ट्रकच्या चाकाखाली महिला येऊन जागीच ठार.
नवले पूल ते कात्रज कडे जाणाऱ्या रोडवर आज सकाळच्या सुमारास जुपिटर वरून जाणाऱ्या दांपत्यांच्या जुपिटरला भरघाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ज्युपिटर ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मागे बसलेली महिला ट्रकच्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव वैशाली कांबळे .( वय.३९. रा.धायरी.पुणे.) असे आहे. तर अपघातात जखमी झालेल्या त्यांच्या पतीला उपचाराकरिता तातडीने भारती हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सदरचा अपघात हा अशोका लीलेंड. शोरूम जवळ झाला आहे. या भागात रस्ता रुंदीकरणाचे काम दीर्घ काळापासून धीम्या गतीने चालू असून रोडवर देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे पडले आहेत व संपूर्ण रोडच खड्डेमय झाला आहे. खराब रोडमुळेच सदरचा अपघात झालेला दावा प्रत्यक्ष दर्शनींनी केला आहे. अपघातात ठार झालेल्या महिलेचा मृतदेह पुढील उत्तरणी तपासणी साठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. सदर रोडवरील खड्ड्यांचे कामासंदर्भात पीडब्ल्यूडी भगाने या रोडचे डांबरीकरण तातडीने करणे व खड्डे बुजवणे गरजेचे असून रोजच खड्ड्यामुळे बाईक स्वरांना या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच खड्डे चुकविण्यासाठी बाईक सरांना तारेवरची कसरत करावा लागत आहे. व पाठीमागून भरघाव वेगाने येणाऱ्या वाहनामुळे सदर अपघात घडत आहेत. व अपघाताची मालिका या रोडवर चालू आहे. त्यामुळे अनेक दिवसाची सरांना आपल्या प्राणाला मुकावा लागत आहे. यामुळे पीडब्ल्यूडी च्या प्रशासनाने या रोडवरील खड्डे बुजून रोडचे डांबरीकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पावसामुळे संपूर्ण रस्ताच खड्डेमय झाला आहे. असे या भागातील नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.