Kidnapping : ४ कोटीच्या खंडणी करिता एका ज्येष्ठ सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण! सहा जण अटकेत

औरंगाबाद शहरात गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढत चालले असून ४ कोटी रुपयांची खंडणी करीता सेवा निवृत्त अधिकारी यांचे अपहरण करण्यात आले आहे.योग्य वेळी पोलिसांनी सर्तकता दाखविल्या सदर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सदर अधिकाऱ्याची सुटका केली आहे. व सहा जणांना अटक केली आहे.
सदरच्या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार. औरंगाबाद जिल्ह्यातील इब्राहिमपूर तालुक्यात ही घटना घडली असून शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास.उद्योग मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी विश्वनाथ लक्ष्मण राजळे ( ६० ) यांचे अपहरण करण्यात आले होते.राजळे यांनी इब्राहिमपूर शिवारामध्ये शेतजमीन घेतली होती. शनिवारी दुपारी ते सालदार दीपक भागवत सोबत काम आटोपून आपल्या फार्म हाऊस वर आले होते. त्याचवेळी आणण्यात आरोपींनी राजळे यांना मारहाण केली. व चाकूचा धाक दाखवून त्यांना गाडीत बसविले व त्यांचे अपहरण केले.
अपहरण केल्यानंतर आरोपींनी राजळे यांच्या मुलाच्या फोनवर फोन करून त्यांना ४ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती परंतु राजळे यांच्या मुलाने त्वरित पोलिसांची संपर्क साधून अपहरण झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या लोकांचे लोकेशन शोधून काढले व त्यांना अटक केली आहे. व पोलिसांनी राजळे यांची सुटका केली असून. विकास भगवान खरात. पांडुरंग पडूळ. रोहित दीपक भागवत. बबनराव वाघ. राहुल बबन गुंजकर. दीपक भागवत. या सर्वांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मधी राजळे यांची सालकरी पिता पुत्रांचा या अपहरण मध्ये सहभाग आहे. याप्रकरणी पुढील तपास औरंगाबाद पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.