पुणे पोलिसांनी त्यांचे रॅकेटचा भांडाफोड केल्याने त्याचा डाव फसला : पुण्यात शिक्षणाच्या माहेरघरात ललित पाटीलला अंमली पदार्थ निर्मितीचा सुरू करावयाचा होता कारखाना.पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा

पुणे दिनांक १७ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा ड्रग्ज माफिया ललित पाटील बाबत पुणे पोलिसांनी खळबळ उडवून देणारी माहिती न्यायालयात दिली आहे की.नाशिक प्रमाणे ललित याला शिक्षणाचा माहेर घरात अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करावयाचा होता.मात्र सर्व प्रथम पुणे पोलिसांनी तो ससून रुग्णालयात उपचार घेत असतांनाच त्याचा ड्रग्ज पकडून त्याला अटक करण्यात आल्यांने त्याचा भांडाफोड केला त्यामुळे त्यांचा डाव फसला आहे.दरम्यान पुण्यात त्याला ड्रग्ज निर्मितीचा कारखाना हा पुणे हे शिक्षणाचे माहेरघर येथे सुरू करावयाचा होता.त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कोणत्या व्हाइट कॉलर नेत्यांचा हात आहे,? आता असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान पुणे पोलिसांनी या ड्रग्ज प्रकरणी मुंबई येथून अन्य दोन आरोपींना ताब्यात घेऊन पुण्यात चौकशी साठी आणले असून.या दोन्ही आरोपींनी ललित याला ड्रग्ज प्रकरणी मोठी मदत केल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे. यावेळी पोलिसांनी न्यायालयात दावा केला आहे.यावेळी न्यायालयाने दोन्ही आरोपींना २० नोव्हेंबर पर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे.दरम्यान यातील आरोपी हरिश्र्चंद्र पंत याचा नाशिक येथील औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या मेफिड्रोन निर्मिती कारखान्यात प्रशिक्षण . उत्पादन व विक्रीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.ललित पाटील व मास्टर माईंड अरविंद लोहारे यांच्या सांगण्यावरून तो हे काम करत होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.