Crime : स्प्तश्रृंगी घाटात लालपरी ३०० फूट दरीत कोसळली १ महिला प्रवासी महिला ठार तर अन्य २५ प्रवासी जखमी

पुणे दिनांक १२जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) नाशिक च्या स्प्तश्रृंगी घाटात मुक्कामी जाणारी लाल परी बस ३०० फूट दरीत कोसळली असून यात एक महिला प्रवासी महिला ठार झाली आहे. तर अन्य २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. सदरची अपघाताची घटना रात्रीच्या वेळी झाली आहे. मुक्कामी बस असल्या मुळे प्रवासी जास्त होते. स्थानिक नागरिकांनी व प्रशासनाच्या वतीने जखमीप्रवासांना दरीतून बाहेर काढण्याचे बचाव कार्ये चालू आहे.
पोलीस सूत्रांनच्या माहितीनुसार ही लाल परी बस स्प्तश्रृंगी गडावरून खामगावला जात असतांना रात्रीच्या वेळेस सर्वत्र धुके होते त्या मुळे सदरची बस ही गणपती टप्प्यावरून ३०० फुट दरीत कोसळली असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. सदरची बस ही खामगाव मुक्कामी होती त्या मुळे बस मध्ये प्रवासी संख्याही जास्त होती. या अपघातात एका महिला प्रवासी महिला ठार झाली आहे. तर अन्य २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवासी यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या वतीने बचाव कार्ये चालू आहे. प्रवासी यांना खोल दरीतून बाहेर काढण्याचे काम चालू आहे. अपघाताची माहीती कळताच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे घटना स्थळी दाखला झाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.