पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज : जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याऱ्यावर लाठीचार्ज व हवेत गोळीबार

पुणे दिनांक १सप्टेबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालन्यात गेली तीन दिवसांपासून शांततेत आंदोलन सुरू असताना आज आंदोलनस्थळी पोलिस यांनी आंदोलन करते याच्या बरोबर चर्चा करताना गोंधळ उडाला व पोलिसांनी आंदोलकांना बळाचा वापर करून आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्यावेळी दगडफेक करण्यात आली आहे.यावेळी हवेत गोळीबार करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.मुख्यमंत्री यांची आंदोलका बरोबर चर्चा झाली होती पण.आंदोलक हे त्यांच्या मागण्या बाबत ठाम होते.उपोषन मागे घेत नव्हते.आज दुपारी अचानक पणे मोठा पोलिस बंदोबस्त आणण्यात आला होता.काल पासून फौजफाटा वाढविला होता.कुणबी प्रमाणपत्रासाठी हे आंदोलन सुरू होते.पोलिस हे आंदोलन मागे घेण्यासाठी आंदोलका बाबत चर्चा चालू होती.पंरतू आंदोलक उपोषण मागे घेण्यास तयार नव्हते यातच मोठा गोंधळ उडाला .व पोलिस अमाणुष पध्दतीने लाठीचार्ज करत होते.संत्पत झालेले नागरिकांन कडून यावेळी दगडफेक करण्यात आली आहे.पोलिसांनी हवेत गोळीबार करुन दोनअश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याच माहिती मिळत आहे. गावात दगडांचा खच पडला आहे.आता या नंतर मराठा समाज चांगलाच संत्प्त झाला आहे.वाहन जाळण्यात येत असल्याची माहिती आता मिळत आहे.आंदोलंकावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस.शिवसेना उध्दव ठाकरे गट.काॅग्रेस यांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.