Salman khan : सलमान खानला मारण्याचा तीन महिन्यात दोनदा प्रयत्न, लॉरेन्स बिश्नोई टोळीतील शार्प शूटर ची कबुली

पंजाब पोलिसांनी ३ दिवसापूर्वी शार्प शूटर कपिल पंडित ला अटक केली होती. त्याने चौकशी दरम्यान पंडित ने पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक खळबळ जनक माहिती पोलिसांना दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून एकंदरीत तीन महिन्यांत दोन वेळा अभिनेता सलमान खान याला मारण्याचा कट रचला होता.
धक्कादायक बाब म्हणजे सलमान खानला त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसच्या वाटेवरच मारण्याचा कट रचला होता. त्यासाठी शार्प शूटर दीड महिने फार्म हाऊस जवळ भाड्याने खोली घेऊन राहत होते. शार्प शूटर कपिल पंडित यांनी दिलेल्या कबुली जबाबानंतर गायक सिद्धधू मुसेवाल्या मारण्यापूर्वीच लॉरेन्स बिश्नोई ने सलमान खान यांच्या हत्याचा कट रचला होता. प्लॅन ए यशस्वी झाल्यानंतर प्लॅन बी तयार केला होता. या सर्व योजनेचे नेतृत्व गोल्डी ब्रार हा करीत होता. व गोल्डीनेच सलमान खान याला मारण्याकरिता शार्प शूटर कपिल पंडित याची निवड केली होती.
सलमान खान हा त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर जाताना प्राण घातक हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एकंदरीत राजस्थान येथील १९ वर्षांनी देखील काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान याच्यावर लॉरेन्स बिश्नोई याचा सलमान खानवर किती राग आहे. एकंदरीत या प्रकरणावरून दिसून येत आहे. याप्रकरणी शाप शुटर कपिल पंडित. संतोष जाधव. दीपक मुंडी व बाकीचे इतर शाप शुटर पनवेल येथील भाड्याच्या खोलीत राहिले. कारण पनवेल या भागात सलमान खानचे फार्म हाऊस होते. या कारणाने हे सर्व शूटर्स सुमारे दीड महिने तिथे राहिले. लॉरेन्स गॅंग च्या सर्व शूटर्सनी सलमान खान वर हल्ला करण्यासाठी. साठी धारदार शस्त्रे व पिस्तूल व काडतुसे खोलीत ठेवली होती. अशी माहिती पंजाब पोलीस सूत्रांनी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.