Crimes : सिंदखेड राजा खासगी बस अपघातातील मृत्यू च्या नातेवाईकाना मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्या कडून मदत जाहीर विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले ही अंत्यत दुर्दैवी दुःखदायक घटना

पुणे.दिनांक १जुलै. ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम)नागपूर हून पुण्याकडे येणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला बुलढाण्यात सिंदखेड राजा येथे समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्ये रात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात होऊन नंतर बसने पेट घेतला व बसला लागलेल्या आगीत २५.प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा अपघात असून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतेकी ५.लाख रूपये. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी . PMNRF.च्या माध्यमातून प्रत्येकी २.लाख रूपयांची मदत निधी जाहीर केला आहे. या बस मध्ये एकूण ३३.प्रवासी प्रवास करत होते. २५.जणाचा मृत्यू झाला आहे. तर ८.प्रवाशी जखमी झाले असून त्यांना उपचारा करीता बुलढाण्यातील हॉस्पिटल. मध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या बस मधील प्रवाशी हे प्रामुख्याने वर्धा. व यवतमाळ मधील असल्याचे समजते. या दुर्घटने नंतर या गावावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. यातील मृतांची ओळख पटविणे जिकीरीचे झाले आहे.सर्व मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहेत. बस अक्षरश जळून खाक झाली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईक यांना मदत जाहीर केली आहे. सदर घटना स्थळी मुख्यमंत्री व शिंदे व फडणवीस तातडीने दाखल झाले आहेत. तर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील ही घटना अंत्यत दुःखदायक व वेदनादायी आहे. आहे असे ते म्हणले. व परत अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून राज्य शासनाने तज्ज्ञांकडून काही योजना करण्याची गरज आहे. असे ते म्हणाले. उध्दव ठाकरे यांनी देखील बस दुर्घटनेतील मृत्यू झालेल्या प्रवाशांना श्राद्धजंली वाहिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.