Crime : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हातभट्टी दारू वाल्यावर एम. पी.डी.ए.अंतर्गत स्थानबध्देतेची कारवाई

पुणे दिनांक ६ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारूचा धंदा करणारा सराईत व अट्टल गुन्हेगार सत्यवान शाखा राठोड ( वय ३३.राहणार काळे शिवार शिंदवणे. तालूका हवेली जिल्हा पुणे. ) याला १.वर्षा करीता एम.पी.डी.ए.कायद्या न्वये स्थानबध्देचे आदेश. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढला असून राठोड याची आता रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
दरम्यान लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व पी सी बी गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी पार पाडली आहे. राठोड याच्या वर गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. गावठी हातभट्टी भट्टी दारू मुळे नागरिकांच्या आरोग्यास व जिवीतास निर्माण झाला होता. त्याच्या दहशती मुळे नागरिक उघड पणे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करत नव्हते. एम पी डी ए कायद्या न्वये स्थानबध्देचे ही पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची २५.वी कारवाई आहे. या पुढे देखील प्रभावी व प्रति बंधक कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहीती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.