सांगलीतील पलूस गावात : शेतकऱ्यांच्या जमिनीवर रेल्वे ट्रॅक शेतकऱ्यांनी रोखून धरली महाराष्ट्र एक्सप्रेस

पुणे दिनांक १३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सांगली जिल्ह्यातील पलूस येथे शेतकऱ्यांच्या शेतजमीनवर रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे ट्रॅक उभारल्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील वसगडेमध्ये संतप्त झालेल्या नागरिकांनी तब्बल एक तासाहून अधिक वेळ कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस रोखून धरण्यात आली होती.जोपर्यत रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन या ट्रॅकप्ररकणी निर्णय देत नाही तोपर्यंत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.
दरम्यान याप्रकरणी वसगडेमधील सर्व शेतकरी व ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.हे शेतकरी मागील १० महिण्यांन पासून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत आहेत.रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे ट्रॅक करतांना शेतकऱ्यांच्या शेतात केलेले अतिक्रमण व बंद करण्यात आलेले शेतरस्ते पूर्ववत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे.याप्रकरणी शेतकऱ्यांच्या वतीने दावा करण्यात आला की गेल्या अनेक वर्षांपासून हे आंदोलन करण्यात येत आहे.मात्र रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.आम्ही रेल्वे आडवली नाही आम्ही आमच्या शेतात बसलो आहे.नाइलाजाने आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे.जोप्रर्यत आम्हाला लेखी रेल्वे प्रशासनाच्या वतीने मिळत नाही.तोप्रर्यत आम्ही माघार घेणार नाही.अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांच्या वतीने घेण्यात आली .
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.