मराठा आंदोलनांचा वणवा पेटला : बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपरिषद संतप्त आंदोलंकानी लावली 🔥 आग

पुणे दिनांक ३० ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाज आंदोलनाच्या मुद्यांद्यांवरुन मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाला असून आज सकाळी माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगल्यावर दगडफेकेची घटना व गाड्या पेटवल्याची 🔥 आगीची धग कुठे विझते तोच संतप्त झालेल्या आंदोलंकानी आता दुपारी माजलगावच्या नगरपालिकेला आग लावली आहे.
दरम्यान आज दुपारी मराठा समाजाच्या आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन मराठा समाजाचे आंदोलक उग्र रूप धारण केले आहे.आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक केली व पार्किंग मधील चारचाकी व दुचाकी गाड्या पेटवून दिल्या त्यांची धग कुठे शमते तोच आंदोलंकानी माजलगावच्या नगरपालिकेला 🔥 आग लावली असल्याची अपडेट आता हाती आली आहे .आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे.तसेच माजलगाव येथे पोलिस वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे.यात दोन पोलिस जखमी झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.