पुण्यात शिक्षणाच्या माहेरघरात बुवाबाजी : २० लाखांचे १२ कोटी करुन देतो हरिद्वारला पूजाअर्चा करुन येतो बारा दिवसांत ५ कोटी होतील पुण्यात फसवणूकीची घटना

पुणे दिनांक १ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बारा दिवसांत २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करुन देतो.असे सांगून पाण्याचा टाकीत २० लाख रुपये टाकायला सांगून त्या नंतर त्यानंतर खोलीत धुर करुन आम्ही हरिद्वारला जाऊन पूजाअर्चा करुन येतो व नंतर तुमचे २० लाखांचे ५ कोटी होतील असं सांगून पळून गेले.सदरची बुवाबाजीची घटना पुण्यातील नारायण पेठेत एका महिलेची फसवणूक केली आहे.या फसवणूक प्रकरणी संबंधित महिलाने विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.पोलिसांनी चौघांजणांन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की.पुणे शहरातील ४१ वर्षिीय महिलेने फसवणूक बाबत विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी १) तन्वीर पाटील.२) शिवम गुरुजी ३) सुनिल राठोड.व ४) आनंद स्वामी.यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.४१ वर्षीय फिर्यादी महिला व व्यवसायीक भागिदार यांच्या प्लाॅटच्या व्यवाहराच्याबाबत दोन महिन्यांन पूर्वी ओळख तन्वीर पाटील यांच्या बरोबर ओळख झाली होती.पाटील यांने इतरांनी संगनमत करून तिघांना वीस लाखांचे ५ कोटी रुपये करुन देतो असे सांगून व आमिष दाखवले. व पाटील यांच्या भुलथापांना बळी पडून तिघांनी २० लाख रुपये जमवले दरम्यान १३ सप्टेंबर रोजी २०० लिटरच्या बॅरेल मध्ये २० लाख रुपये टाकायला सांगून.व नंतर त्या खोलीची लाईट बंद करून त्या खोलीत आरोपींनी धूर केला .व महिलेला आम्ही हरिद्वारला जाऊन पूजाअर्चा करून आल्यावर तुमच्या २० लाख रुपयांचे १२ दिवसांत ५ कोटी रुपये होतील असे सांगून हे चौघेजण २० लाख रुपये घेऊन गेले.याप्ररकणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ४१ वर्षीय महिलांने विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. या बाबत पुढील तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.