Crimes : विमान हायजॅक करण्याची वल्गना करणाऱ्या व्यक्तीस अटक.

पुणे.दिनांक २३.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासा दरम्यान फोन द्वारे अज्ञात व्यक्ती बरोबर विमान हायजॅक करण्याची वल्गना करून विमान मध्ये दहशत पसरविणाऱ्या एका युवकास मुंबईच्या सहार पोलीसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेला युवक हा मुळचा हरियणा मध्ये राहणारा असून .तो दिल्ली ते मुंबई असा प्रवास विस्तारा या कंपनीच्या विमानातून करीत होता.
विमान प्रवासा दरम्यान या युवकाने एका अज्ञात व्यक्तीला फोन लावून " अहमदाबाद चे फ्लाइट निघणार आहे .काही समस्या असेल तर मला फोन कर. हायजॅक चे संपूर्ण प्लॅनिंग झाले आहे.काहीही चिंता करू नको. " असे सांगत होता. आपल्या फोन द्वारे कोणा बरोबर तरी संपर्क साधून या फोनच्या माध्यामातून विमानात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या घटने बाबत विधानातील कर्मचारी यांनी सहार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्यानंतर या तरुणला अटक करण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.