Pune Crime : न्हरे मध्ये गारवा बिर्याणी हाॅटेलच्या मॅनेजरच्या डोक्यात वार करून केला खून.अज्ञात हल्लेखोर फरार

न्हरे मध्ये पारे कंपनी चौकात मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल गारवा बिर्याणी मध्ये काम करून घरी जाणाऱ्या मॅनेजरला पारे कंपनी चौकात निर्मिती असोशिएट बिल्डिंग समोर आडवून अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात शरीरावर व हातावर असे वार करून त्याचा खून केला आहे.
सदरच्या घटनेबाबत सिंहगड पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. गारवा बिर्याणी हॉटेलचे मॅनेजर भरत भगवान कदम ( वय.२४. रा. धायरेश्वर प्राइड बिल्डिंग धायरी पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे कामावरून त्यांच्या मोटरसायकल वरून धायरीकडे घरी जात असताना.न्हरेतील पारे कंपनी रोडवरील निर्मिती असोसिएट जवळील बिल्डिंग समोर जवळील गायकवाड यांच्या मोकळ्या जागेत अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना आणून धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यात शरीरावर व हातावर असे वार करून त्यांचा खून केला आहे.
सदरची घटना ही रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली असावी. या घटनेबाबत रात्रीची गस्त घालणारे मार्शल यांना कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेबाबत सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
या घटनेची माहिती वरिष्ठ सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाला भेट देऊन सदर घटनेबाबत तपासाच्या दृष्टीने पोलिसांना मार्गदर्शन केले. मयत मॅनेजर यांची मोटरसायकल व खिशामधील पाकीट अन्य वस्तू घटनास्थळावरच पडल्या होत्या. चा अर्थ त्यांचा खून हा चोरीच्या उद्देशाने नक्की झाला नाही. असे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. आता नेमके या खुना मागचे कारण काय.याचा शोध पोलीस यंत्रणा नक्कीच लावेल. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्याकरिता पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. सदरच्या खूना बाबत भरत याचा भाऊ प्रकाश कदम यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून. पोलिसांनी अज्ञात हलेखोराविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.